फटाके फोडण्याचे वाद, तीक्ष्ण हत्याराने वार

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे >> शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी उपनगरातील क्रांती चौकात राहणाऱ्या संदीप रामदास कोकणी ( वय ३७) या तरुणाने तक्रार दिली आहे. घराजवळील काही मुले बाहेर फटाके फोडत होती. याचवेळी गणेश शिंगोडे हा मुलांना शिवीगाळ करत होता. याच जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे गणेश याने दमदाटी करत मारहाण केली. तसेच काही तरी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार केला. पाच ते सहा हजार रुपये गहाळ झाल्याची अशी तक्रार संदीप कोकणी याने दिली आहे.