वडिलांच्या वर्षश्राद्धाला मुलीने केले मुंडण

धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> शहरातील गणेशनगर, भोई सोसायटीत वडिलांच्या वर्षश्राद्धाला कन्येने मुंडण केले. त्याबद्दल प्रा.बबिता वाडिले त्यांचा सत्कार करण्यात आला. संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील व जिल्हा सचिव दीपाली पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रा. वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विमल वाडिले, सरस्वती शिवदे, माधुरी वाडिले, अरुणा चव्हाण, संगीता तायडे, फत्तू शिवदे, मुकेश शिवदे, गीतांश शिवदे, विशाल शिवदे, नीलेश माळी, गणेश कोटीयल, प्रणिकेत पाटील, राहुल वाडिले, धीरज पाटील, राकेश शिरसाठ, नीलेश वाडिले, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.