अल्पवयीन मुलीला पळवून बलात्कार; एकाविरुद्ध गुन्हा

क्राईम धुळे निषेध माझं खान्देश साक्री

धुळे >> साक्री तालुक्यातील कासारे गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारे गावातील अल्पवयीन मुलीला सुनील सुरेश सोनवणे याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. यानंतर तिला आसखेडा गावाजवळील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यावरून साक्री पाेलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.