चितोडरोड परिसरात रिक्षातून जप्त केला ५० हजारांचा मद्यसाठा

क्राईम धुळे पाेलिस माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> शहरातील चितोडरोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून विदेशी मद्याची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. अन्य एक जण फरार झाला आहे.

कारवाईत रिक्षासह सुमारे ५० हजारांचा मद्यसाठा जप्त केला.शासकीय दूध डेअरी परिसरातून जाणाऱ्या रिक्षातून (एमएच १९, ४३५) मद्याची वाहतूक केली जात होती.

पोलिसांनी हे वाहन अडवून तपासणी केल्यावर त्यात चार बॉक्समध्ये मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी सारंग विजय पवार (वय २९), भीमरत्न रत्नशील सोनवणे (वय २५, दोघे रा. भीमनगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

विशाल प्रवीण सोनवणे हा पसार झाला. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहायक उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, भिकाजी पाटील, मुख्तार मन्सुरी, संदीप पाटील, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, अविनाश कराड यांनी ही कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.