धरणगाव प्रतिनिधी > खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेती कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदी तसेच पेरणी संदर्भात योग्य माहिती मिळावी म्हणून चिंचपूरा येथे कृषि विभागा अंतर्गत खरीप हंगामा पूर्वी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिला उपस्थित होत्या यावेळी कृषि सहाय्यक श्री. ईश्वर पवार यांनी शेंद्रीय शेती कशा पध्दतीने केली पाहिजे या विषयी माहिती दिली. तसेच बियाणे उगवन शक्ती तपासणी संदर्भात प्रशिक्षण दिले. प्रसंगी गावातील महिला शेतकरी उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे अभार प्रदर्शन कैलास पाटील यांनी केले.