कंगना रानावतच्या निषेर्धात धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन

Politicalकट्टा धरणगाव

धरणगाव ::>धरणगाव येथे अभिनेत्री कंगना राणावतनी महाराष्ट्र राज्य विषयी अपशब्द वापरण्याचा निषेधार्थ धरणगाव शिवसेनातर्फे जोडे मारो आंदोलन करून महिला आघाडी वतीने सह्ययक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

यावेळी निवेदनात अशी मागणी करण्यात आली की अभिनेत्री कंगना रानावत यांनी मुंबई पोलीस सह महाराष्ट्र तिला 15 कोटी जनतेच्या अपमान केला आहे, महाराष्ट्रचा अपमान केला म्हणून राष्ट्रद्रोह चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी चा वतीने करण्यात आली.

कंगना ने त्वरित माफी न मागल्यास पुढील काळात शिवसेना स्टाईल ने पुन्हा अदोलन करण्यात येईल असे आव्हान शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख यांनी निवेदनात म्हटले आहे, यावेळी उपस्थित धरणगाव उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेविका अंजली विसावे, कीर्ती मराठे, आराधना पाटील, महिला आघाडी धरणगाव शिवसेना शहर प्रमुख रत्ना बाई धनगर, सुनीता चौधरी, भारती चौधरी, माधुरी निलेश चौधरी नेहा पाटील, स्वीटी चौधरी, नेहा जोशी, डॉली भंडारी , व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *