धरणगाव तालुक्यातील पिंप्रीत दारू दुकान फोडले…

धरणगाव सिटी न्यूज

धरणगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसत असून दारुड्यांनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी दारुची दुकानचं फोडली आहेत. १० दिवसांपूर्वी अशीच घटना धरणगाव तालुक्यातील प्रिंपी येथील दारू दुकान फोडल्याची घटना ताजी असतांनाच आज (दि.३ मे) शनिवारी सकाळी पुन्हा बिअर व वाईन शॉप फुटल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरातील दारु पिणाऱ्यांमध्ये खळबळ माजलीय.

वाढत्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन कालावधी दरम्यान मद्यविक्री बंदी असल्यामुळे तळीराम चांगली पंचाईत होत आहे. परिणामी, धरणगाव तालुक्यातील प्रिंपी येथील दारू दुकान १० दिवसांपूर्वी फोडल्याची घटना ताजी असतांनाच आज (दि.३ मे) शनिवारी सकाळी पुन्हा बिअर व वाईन शॉप फुटल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथे शासनमान्य देशी दारू दुकान फुटण्याच्या घटनेला पंधरा दिवस होत नाही तोच रात्री २ मे रोजी मुख्य रस्त्यावरील बालाजी बिअर आणि वाईन शॉपचे दुकान फुटल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजलीय. पिंप्रीत शासनमान्य दोन बिअर बार, एक देशी दुकान व एक बिअर शॉप आहे. संचारबंदीमध्ये हि सर्व दुकानांच्या स्टॉक सील असून दुकाने बंद असतांना देखिल पिंप्रीत देशी विदेशी मदयासह गावठी दारूची चढया भावाने लपूनछपून विक्री सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या यांच्यावर कुठलाही वचक गावात दिसत नाही. दारूबंदी विभागाने जिल्हयात अमळनेर व जळगाव शहरातील परवानाधारकांची सिल स्टॉकची तपासणी करत स्टॉकमध्ये तफावत असलेल्या दुकानदारांवर गुन्हें दाखल केले आहेत.

या कारवाई पासून वाचण्यासाठी तळीरामांनीच आपले दुकान फोडले हा एकच साधा अन् सोपा पर्यायाच्या वापर दुकानदार करीत असल्याचे सुज्ञ नागरीकांचे म्हणणे असून अशीच चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *