५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम धरणगाव निषेध पाेलिस

धरणगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील बांभोरी येथील एका ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धरणगाव पोलिसांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही पती-पत्नी शेत मजुरी करण्यासाठी शेतात जातो. तर आमची मुलगी घरीच राहते. ती घराजवळ असलेल्या लहान मुलांसोबत खेळते. नेहमीप्रमाणे आम्ही ९ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी निघून गेलो. त्यावेळी माझी मुलगी घरीच होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आले असता माझी मुलगी ही घराकडे येत होती.

त्यावेळी टेरू जमादार बारेला (वय २४, रा. मध्य प्रदेश, ह.मु. बांभोरी) हा मुलीला, ‘तुला दहा रुपये देतो, कुणाला काहीही सांगू नको’ असे सांगत होता. मी त्याला, ‘तू मला माझ्या मुलीला दहा रुपये का देत आहे’, असे विचारल्यानंतर तो तेथून पळाला. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली हकीकत सांगितली.

सायंकाळी पती घरी आल्यानंतर मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. सायंकाळी पाहली असता बारेला हा त्याची दुचाकी सोडून पळून गेला होता. याप्रकरणी टेरू बारेला याच्याविरुद्ध कलम ३७६ व पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशियताच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. तपास पोनि पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.