धरणगाव ची वाटचाल कोरोनामुक्त दिशेने…प्रशासनाचे यश…यशस्वी उपचार

धरणगाव सिटी न्यूज

धरणगाव शहरामध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० होती. त्यापैकी २ महिला रुग्ण जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होत्या.उपचारादरम्यान त्या दोन महिला रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.त्यापैकी उरलेले ८ रुग्ण धरणगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होते.त्यापैकी सलग दहा दिवसांपासून उपचार घेत असलेले ७ रुग्ण आज बरे झाल्यामुळे व त्यांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडण्यात आले. त्यांना घरी सोडताना गुलाबपुष्प, पेढे देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

घरी जाताना त्यांचे समुपदेशन करण्यात आले.तसेच त्यांना घरी जाताना चौदा दिवस होम क्वारंटाइन होण्यासंबंधी प्रशासनाने कळविले.कोविड केअर सेंटर धरणगाव येथे आता एक कोरोणाग्रस्त उपचार घेत आहे.या रुग्णालासुद्धा आज रोजी कोणतीही लक्षणे नाहीत. या सर्व बाबींवरून आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की कोरोणा विषाणूमुळे झालेला रोग योग्य औषध उपचारामुळे १००% बरा होतो.

यावेळी प्रांत अधिकारी एरंडोल श्री विनय गोसावी,नगराध्यक्ष श्री निलेश चौधरी, तहसीलदार श्री देवरे,मुख्याधिकारी श्री पवार,तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉ सोनवणे,CCC इंचार्ज डॉ श्री गिरीश चौधरी,नायब तहसीलदार श्री मोहोड उपस्थित होते…. यावेळी अंबुलन्स मध्ये बसण्या अगोदर उत्तम व्यवस्था बाबत रुग्णांनी प्रशासन चे कौतुक केले व झालेल्या तक्रारी खोट्या असल्याचे सांगितले. तरीसुद्धा सर्वांनी आपल्या घरांमध्ये सुरक्षित राहावे हे आवाहन प्रशासनाने सर्व धरणगावकरांना केलेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *