धरणगावात कोविड १९ कोरोनाने उघडले खाते…

धरणगाव सिटी न्यूज

धरणगाव – कोरोना मुक्त म्हणून ओळख असलेल्या धरणगाव शहरात ६४ वर्षीय महिलेचा रिपोर्ट १६ रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ माजली आहे. महिलेच्या तपासणी अहवालावर जळगावचा रहिवास दाखवल्याने हा रिपोर्ट जळगावचा समजला गेला. मात्र प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी सदर महिला धरणगावातील नवेगाव परिसरातील असल्याची जिल्हा प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. हा रिपोर्ट धरणगावचा असल्याची शहानिशा झाल्यानंतर तालुका प्रशासनाची धावपड उडाली. नवेगाव परिसर पूर्णपणे सील केला असून पॉझिटिव्ह महिलेच्या नातेवाईकांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्याची हालचाल सुरू झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *