धरणगाव तालुक्यातील २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या क्राईम धरणगाव

धरणगाव >> तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील अनिल राजू धनगर (वय २७) या तरुणाने ५ मार्चला सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.

आई शेतात गेल्यानंतर घरी एकटा असताना अनिल धनगर याने आत्महत्या केली. आई घरी आल्यावर त्यांना अनिल याने गळफास घेतल्याचे दिसले. यामुळे त्यांनी आरडाओरड केली.

शेजाऱ्यांनी लगेच धाव घेऊन अनिलला खाली उतरवून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. आरोग्य अधिकारी गिरीश चौधरी यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.