दोन तरुणींचा समावेश. कोरोना बाबत जनजागृती
धानोरा ता. चोपडा (वार्ताहर ) प्रशांत चौधरी >> चोपडा तालुक्यातील धानोरा गावात सहा विशेष पोलिस अधिकारी स्वंयस्फुर्तीने कोरोना बाबत कर्तव्ये बजावतांना दिसत आहेत.तसेच कोरोना बाबत अधिकची जनजागृती करतांना दिसत आहे.विशेष म्हणजे या ०६ जणांमध्ये दोन तरुणींचा समावेश असल्याने रस्त्यावर फिरणा-या टारगट तरुणांचा गट गायब झालेला आहे.
कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृती तसेच ठिक-ठिकाणी गर्दी कमी होण्यासाठी पोलिस पाटील यांच्या मदतीला गाव पातळीवर विशेष पोलिस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली आहे.यांची नेमणुक ही चोपडा येथिल उपविभागीय अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.हे विशेष पोलिस अधिकारी गावातील मुख्य चौक,बँकेबाहेर,ठरावीक कालावधी भरलेला बाजाराठिकाणी,मेडीकल जवळ,दवाखाना जवळ,बसस्थानक परीसर,किराणा दुकान आदी ठिकाणावर थांबत आपले कर्तव्ये बजावतांना दिसतात.यामुळे गावात रिकामचोट फिरणारे टारगट तरुण कमी झाले असुन,गावात कट्यावर बसणारेही कमी झाले आहेत.
गावातील मुख्य हनुमान मंदिर चौक,शिवाजी चौक हे बंद करण्यात आले आहे.फक्त पायी चालणारे,एक मोटारसायकल जाईल एवढी जागा शिल्लक ठेवली आहे.गावात बाहेरगावाहुन येणारी एकही मोटारसायकल ही गावात जात नाही.ठरावीक अंतरावर थांबवुन जिवनावश्यक वस्तु घेण्यासाठी त्यांना पायी पाठवले जाते.यावेळी विशेष पोलिस हे थांबुन असतात.यामुळे गावातील गर्दी कमी झालेली आहे.यावेळी एकही व्यक्ती मास्क घातल्याशिवाय गावात येऊच शकत नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या खर्चातुन निटायझर उपलब्ध करुन दिले आहे.दुसरीकडे अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी आपआपल्या वार्डात मिळालेले मास्क,निटायझर वाटप केले आहे.
यांचा आहे समावेश
खुशबू महाजन,तेजस्वीनी महाजन,हितेंद्र पाटील,जयेश चौधरी,डिगंबर सोनवणे,मच्छिंद्र महाजन यांचा समावेश आहे.हे सर्व जण पोलिस पाटील दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहत आहे.सकाळ-संध्याकाळ थांबुन आपली विशेष कामगिरी बजावत आहेत.यांना मदत म्हणुन पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील,माजी उपसभापती माणिकचंद महाजन,वैद्यकिय अधिकारी डॉ उमेश कवडीवाले, पत्रकार राजेंन्द्र चौधरी, प्रशांत चौधरी,प्रशांत सोनवणे,क्रिडाशिक्षक देविदास महाजन,संदिप पवार,प्रविण ठाकूर , वासुदेव महाजन यांचेही सहकार्य लाभत आहे.
उच्चविद्याविभुषित तरुणी बंदोबस्तात
जगावर व भारतात आलेल्या व्हायरस लढ्यात आपली काही मदत मिळाली पाहीजे या अनुषंगाने गावातील दोन तरुणी चक्क बंदोबस्त राखतांना दिसत आहेत,यात खुशबु महाजन ही राष्ट्रीय बॉक्सर असुन तेजस्वीनी पाटील ही एम एस्सी चे शिक्षण घेत असुन आपल्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा दलातही काम करत आहे.