”मरेल पण गावभर फिरेल” अशी परिस्थिती धानोऱ्यात शे का मंडळी ?

चोपडा

चोपडा तालुक्यातील धानोरा गावात कोरोनाचे गांभीर्य नाहीच?

धानोरा विलास सोनवणे प्रतिनिधी >> कोरोना या आजाराने जिल्ह्याभरात थैमान मांडले असताना अनेक ठिकाणी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र धानोरा गावात कोणत्याही प्रकारचे शासकीय नियम पाळले जात नसून स्थानिक प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गावातील काही जण स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून धिंडोरा पिटवणारे स्वतःच तोंडला मास्क न लावता संपूर्ण गावाला ज्ञान देत फिरत आहेत. ग्रामपंचायत प्रशासन मात्र गावातील नियम मोडणाऱ्या नागरिकांकडे मुद्दाम डोळेझाकपणा करून गावात कोरोनाला आमंत्रण देत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गावातील काही ओट्यावर नागरिक विना मास्क गप्पा मारत बसलेले आहेत. तर गावात कोणालाही काही होणार नाही या अविर्भावात आहेत. तसेच गावातील काही स्वतःला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते समजणारे तोंडाला मास्क न लावता गावभर हिंडतात. व दुसऱ्यावर मात्र रोष काढतात असे चित्र सध्या धानोऱ्यात आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोणीही विना मास्क फिरणार नाही असे आदेश असताना मात्र गावातील काही मंडळी बिनधास्तपणे फिरत असतात. ५० वर्षावरील नागरिकांना बाहेर येण्यास मज्जाव असताना मात्र काही ज्येष्ठ मंडळी मुद्दाम चौकात काय घडत आहे हे पाहण्यासाठी दिवसांतून चार ते पाच वेळा चक्कर मारून जातात. तर काही युवक नेहमीच्या कट्ट्यावर जाऊन गर्दी करत आपली मौजमस्ती पूर्ण करताना दिसत आहे.

गावातील काही दुकानांमध्ये लोक गर्दी करून टाईमपास करताना दिसत आहेत. तर चोपडा-यावल रस्त्यावर तोंडाला मास्क न लावता सर्हासपणे फिरणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करणार आहे का? की गावात असेच चालू राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *