धानोरा येथील हॉटेलातील ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला ; गुन्हा दाखल

अडावद क्राईम चोपडा चोरी, लंपास रिड जळगाव टीम

धानोरा प्रतिनिधी >> चोपडा तालुक्यातील धानोरा गावा नजदीक असलेल्या हॉटेल जत्रा बियरबार व परमीटचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून ५९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

किशोर मुरलीधर बाविस्कर (वय-३५) रा. अडावद यांचे धानोरा-अडावद रोडवर हॉटेल जत्रा बिअरबार आणि परिमीटचे हॉटेल आहे. त्यांच्या दुकानात देशीविदेशी दारू ठेवण्यासाठी गोडावून देखील आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी हॉटेल बंद करून निघून गेले. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्यांनी दारूचे गोडावून फोडल्याचे दिसून आले. गोडावूनची पाहणी केली असता त्यांना ५९ हजार रूपये किंमतीचे विदेशी दारूचे २० खोके आणि सीसीटीव्हीचा डिव्हीआर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.