‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणीला लग्नाच्या दोन दिवस आधी धमकी

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा पाेलिस यावल

प्रतिनिधी जळगाव >> दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीस ‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणाने धमकी देऊन विनयभंग केला. ही घटना जळगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

रोहन साहेबराव सपकाळे (रा. अंजाळे, ता. यावल) या तरुणाने तरुणीला धमकी दिली आहे. रोहन हा गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची छेड काढतो आहे.

दरम्यान, या तरुणीचे लग्न ठरलेले असून २५ रोजी गावातच लग्न समारंभ आयोजित केला आहे. तत्पूर्वी २३ रोजी रोहनने तरुणीचे गाव गाठून तिला धमकी देऊन तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अनिल फेगडे तपास करीत आहेत.

दरम्यान, तरुणीच्या लग्नात बाधा येऊ नये म्हणून गुन्हा दाखल होताच रोहनला अटक करण्यासाठी अंजाळे गावात पोलिस गेले होते; परंतु, रोहन घरी मिळून आला नाही.