नापिकीला कंटाळून धामणगाव येथील तरुणशेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्या क्राईम मुक्ताईनगर

कुऱ्हा काकोडा प्रतिनिधी >> सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून धामणगाव (ता.मुक्ताईनगर) येथील तरूण शेतकऱ्याने शनिवारी (दि.१४) विषारी द्रव्य सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली.

धामणगाव येथील शेतकरी शेख फारूख शेख हुसैन (वय २७) असे मृताचे नाव आहे. त्यांनी शनिवारी दुपारी राहत्या घरात विषारी द्रव्य सेवन केले. मृताच्या आईच्या नावावर इस्लामपूर (जि.बुलडाणा) येथे दोन एकर शेती आहे. या शेतीचे सर्व व्यवहार तोच बघत होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न नसल्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची चिंता त्याला सतावत होती.