देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; रुग्णालयातून घरी परतले

Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

मुंबई प्रतिनिधी ::>विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. पुढचे दहा दिवस फडणवीस यांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे.

या काळात फडणवीस हे ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत. फडणवीस यांना भाजपने बिहार निवडणूक प्रभारी नेमले होते. मात्र त्यांना कोरोनामुळे दौरा अर्धवट सोडावा लागला.