“दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या लोकांचे’

Politicalकट्टा आंदोलन कट्टा पुणे महाराष्ट्र

सांगली >> दिल्लीत सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या पुरस्कृत लोकांचे आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. राज्यातील आमदार, खासदारांना शेतकऱ्यांना चांगला दर मिळू द्यायचा नाही, त्यामुळे कारखान्यांच्या अध्यक्षांनी आमच्याबरोबर खुली चर्चा करावी. उसाला ४१०० रुपये दर कसा देता येतो हे आम्ही दाखवून देऊ, असे खुले आव्हान शेतकरी संघटनेचे संस्थापक रघुनाथदादा पाटील यांनी दिले.

शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे १२ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यभरातून जनप्रबोधन यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत ते इस्लामपुरा येथे बोलत होते. सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करणे, कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत करणे, शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करणे याविषयी आम्ही चर्चा करत आहेत.