रिड जळगाव प्रतिनिधी ::> कासोदा येथून जवळच असलेल्या भातखेडे येथील गिरणा नदीच्या पात्रात बाभळीच्या झाडात 23 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह शुभम अशोक पाटील याचा आहे. तो 23 सप्टेंबरला गिरणा नदीच्या पुरात पिंपळगाव येथून वाहून गेला होता. 14 दिवसांनी त्याचा थांगपत्ता लागला.
बुधवारी काही लोक भातखेडे येथे गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडत होते. यावेळी त्यांना बाभळीच्या झाडात एक मृतदेह दिसला. दरम्यान, हा मृतदेह २३ सप्टेंबरला पिंपळगाव येथून गिरणा नदीत वाहून गेलेल्या शुभम अशोक पाटील याचा असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी ओळख पटवली.