डांभुर्णीत पोलिसांवर हल्ला, १८ महिलांना दिला जामीन

क्राईम

जळगाव :> खुनातील आरोपीला पोलिस वाहनातून घेऊन जाताना, असताना डांभुर्णी राहिवाशांनी पोलिस ताफ्यावर हल्ला केला होता. या घटनेतील १८ महिला संशयितांचा जामीन अर्ज, भुसावळ येथील अतिरिक्त फौजदारी न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे १८ महिलांनी औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. १८ महिला संशयितांतर्फे अॅड. जितेंद्र पाटील यांनी जळगाव येथून व्हिसीद्वारे युक्तिवाद केला. औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. के. जाधव यांच्या बेंचने महिलांना जामीन मंजूर केला. मानवतेच्या दृष्टीने या महिलांना हा जामीन मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *