दहीगावात ८ फुटी कोब्रा नाग आढळला ; लोकांची एकच धावपळ

Social कट्टा कट्टा यावल

दहिगाव ::> यावल तालुक्यातील दहीगावात सूर्यभान आधार पाटील उर्फ महाराज यांच्या घरातील वाड्यात आठ फुटी कोब्रा नाग आढळून आल्याने कुटुंबियांची व शेजारी लोकांची एकच धावपळ उडाली. सूर्यभान यांनी गावातील सर्पमित्र अजय अडकमोल व शेखर नामदेव अडकमोल यांना पाचारण केले. दोघांनी या नागाचा शोध घेतला.

हा इंडियन कोब्रा जातीचा नाग पाहिल्यावर भल्या-भल्यांची थरथराट होते. त्याला दोघांनी व्यवस्थित पकडून गावाबाहेरील नाल्यात सोडले. यावेळी गावातील बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून गावासह शिवारात अनेक मोठमोठे विषारी, बिनविषारी सर्प निघत आहेत. त्यांना पकडून हे दोघे सर्पमित्र गाव जंगलामध्ये सोडून देत आहेत व त्यांचे प्राण वाचविता आहेत. त्यांच्या या धाडसाबद्दल नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *