जळगाव शहरात मजुरांमध्ये हाणामारी, एकास लोखंडी पट्टी मारून केले गंभीर जखमी!

क्राईम जळगाव

जळगाव ::> गटारीचे काम करणाऱ्या दोन मजुरांमध्ये हाणामारी झाली. त्यात एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता बजरंग बोगद्याजवळ घडली. सचिन रविंद्र बाविस्कर रा. आसोदा रोड वाल्मिक नगर, हा सेंट्रीगचे काम करतो. बुधवारी बजरंग बोगद्याजवळ सकाळी १० वाजता किशोर (पूर्ण नाव-गाव माहिती नाही) यांच्यासोबत कामावरून त्याची शाब्दिक चकमक झाली. यात किशोरने संतापाच्या भारत हातात लोखंडी पट्टीने सचिनच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *