जळगाव >> भुसावळ तालुक्यातील एका गावातील मुलीला फूस लावून अपहरण केलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने मंगळवारी अटक केली. कृष्णा महादेव गोरे (वय २४, रा. कुसुंबा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. १० जून २०२१ रोजी कृष्णा महादेव गोरे याने लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते.

याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गोरे बेपत्ता होता. तो मुलीसोबत कल्याण येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथक कल्याणला गेले होते. मंगळवारी गोरे हा पीडित अल्पवयीन मुलीसह मिळून आला. त्याला अटक करून भुसावळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *