१२ वर्षीय बालिकेस फुस लावून पळविले ; तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल

क्राईम भुसावळ वरणगाव

वरणगाव ::> तळवेल येथील १२ वर्षीय बालिकेस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरूद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. मंगळवारी रात्री ८ वाजता शौचाला जाण्याचा बहाणा करुन मुलगी घराबाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. तर शेजारी राहणारा तरुणदेखील गायब होता. त्यामुळे वरणगाव पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *