भुसावळ ::> तालुक्यातील साकेगाव अाणि वराडसीम येथे तालुका पाेलिसांनी केलेल्या कारवाईत ८ हजार रुपये किमतीची ९० लिटर गावठी दारू पाेलिसांनी जप्त केली. याप्रकरणी दाेन संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
साकेगाव येथील शिंगारबर्डी भागात देवेंद्र अर्जून तायडे आणि वराडसीम येथे भिका सीताराम पाटील या दोघांवर ही कारवाई झाली. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले, असे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले.