प्रतिनिधी जळगाव >> घराचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेने माहेराहून दरमहा २० हजार रुपये आणावे अशी मागणी करीत सासरच्या लोकांनी विवाहितेवर सुरीने वार केल्याची घटना ४ एप्रिल रोजी वाघनगरात घडली.
प्रियंका सागर इंगळे यांचे लग्न वाघनगर परिसरातील कोल्हे हिल्स येथील सागर संजय इंगळे यांच्यासोबत सन २०१९ मध्ये झाले. सुरुवातीच्या सहा महिन्यांनंतर पतीसह सासरच्यांनी घराचा हप्ता भरण्यासाठी प्रियंकाने माहेराहून दरमहा २० हजार रुपये आणावे यासाठी छळ केला. ४ एप्रिल रोजी तिचे हात, पाठीवर सुरीने वार केले. या प्रकरणी प्रियंका इंगळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सागर संजय इंगळे, प्रमोद युवराज इंगळे, विमलबाई संजय इंगळे, पूजा प्रमोद वाघ, प्रमोद युवराज वाघ (सर्व रा. वाघनगर) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.