कापूस खरेदीसाठी नोंदणीचे ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार

Jalgaon जळगाव

जळगाव ::> पणन महासंघातर्फे करण्यात येणाऱ्या कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान कार्यालयातर्फे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

बाजार समितीमध्ये नोंदणी करुन टोकन देण्यासाठी शेतकऱ्यांची ५ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे यंदा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे आग्रही आहेत. त्यानुसार जिल्हा सूचना व विज्ञान केंद्रामार्फत सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले आहे.

पणन महासंघाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सॉफ्टवेअरव्दारे ऑनलाईन नोंदणीसाठी परवानगी मिळाल्यास कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नांेदणीचा जळगाव पॅटर्न राज्यभरात लागू होण्याची शक्यता आहे.