यावल >> बुधवारी तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले, यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. १७ पैकी यावल शहरातील २ तर फैजपूर शहरातील ३ तर अन्य १२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३६४ झाली आहे.
बुधवारी किनगाव येथील एका ६४ वर्षीय पॉझिटिव्ह वृद्धाचा मृत्यू झाला. तर डोणगाव येथे ४४ वर्षीय, ७५ वर्षीय महिला, १८ वर्षीय तरुण व ६ वर्षाच्या बालकास लागण झाली.
साकळीत ४९ वर्षीय पुरुष, १७ वर्षीय युवती, ३० वर्षीय महिला व ६५ वर्षीय वृद्धा असे ४ रुग्ण आढळले.
चितोडा गावात ७० वर्षीय वृद्ध, हिंगोणा येथे ६५ वर्षीय वृद्धा, मनवेलला५४ वर्षीय प्रौढ तर यावल शहरातील पांडुरंग सराफ नगरात एक २० वर्षीय तरुणी व अन्य भागात ६५ वर्षीय वृद्ध असे दोन रुग्ण आढळले.
फैजपुरात ५० वर्षीय प्रौढ, १५ वर्षीय बालक आणि ४२ वर्षीय महिला असे तीन रुग्ण आढळले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तसेच आजपर्यंत तालुक्यात कोरोना बळींची संख्या २६ झाली. त्यामुळे आरोग्य विभागाने आता गावनिहाय सर्वेक्षण सुरु केले आहे.