जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आजपर्यंत 43 हजारांपेक्षा जास्त !

Jalgaon जळगाव

जळगाव :: दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर 298 कोरोनाबाधित आढळले तर  805 कोरोना मुक्त होऊन आपल्या घरी गेलेत.

  सर्वाधिक रुग्ण हे मुक्ताईनगर  व जळगाव शहरात आढळून आले आहेत.

आज आढळलेल्या 298 कोरोनाबाधितांमध्ये मुक्ताईनगर-104, जळगाव शहर-76, भुसावळ-22, जळगाव ग्रामीण-11, अमळनेर-6, चोपडा-25, पाचोरा-7, भडगाव-2, धरणगाव-7, यावल-8, एरंडोल-1, जामनेर-4, रावेर-7, पारोळा-3, चाळीसगाव-7, बोदवड-5 आणि इतर जिल्ह्यांमधील 3 असा समावेश आहे.

आज 805 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आत्तापर्यंत 43 हजार 148 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

आज 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 1 हजार 198 झाला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील 4 हजार 758 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *