जिल्ह्यात या ठिकाणी धक्कादायक प्रकार >> कोरोना संशयित म्हणून अपमानास्पद वागणूक!

क्राईम पहूर

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन

पहुर प्रतिनिधी >> येथील कोविड सेंटर मध्ये कोरोना संशयित म्हणून अपमानास्पद वागणूक देण्यात आली म्हणून याप्रकरणी जामनेरला राष्ट्रवादी-काँग्रेस युवकच्यावतीने संजय गरुड व प्रदीप  लोढा यांच्या मार्गदर्शनानुसार नायब तहसीलदार सुभाष कुंभार यांना निवेदन देण्यात आले. 

खर्चाने येथील गिरीष पंडित पाटील यांच्यासोबत कोरोना संशयीत म्हणून झालेल्या अपमानस्पद वागणुकीबद्दल तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या परिवारातील तसेच गावातील इतर नागरिकांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. राज्य शासनाला तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी शैलेश पाटील युवक अध्यक्ष जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्याम भाऊ सावळे उपसरपंच पहूर पेठ  ग्रुप ग्रामपंचायत, किशोर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, राजू भाई जेंटलमन अल्पसंख्यांक अध्यक्ष, ईश्वर बारी ग्रा.पं सदस्य.आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *