बापरे जिल्ह्यात आज पुन्हा 169 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रुग्णसंख्या साडे पाच हजारच्या उंबरठ्यावर!

Jalgaon जळगाव

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 169 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 73, भुसावळ 13, अमळनेर 9, चोपडा 13, भडगाव 4, धरणगाव 6, यावल 7, एरंडोल 1, जामनेर 10, जळगाव ग्रामीण 16, रावेर 8, पाचोरा 4, चाळीसगाव 4, बोदवड 1 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 5471 इतकी झाली आहे. आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *