दिलासादायक बातमी जिल्ह्यात आज कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त!

Jalgaon जळगाव

जळगाव >> दिलासादायक जिल्ह्यात आज आढळलेल्या 205 कोरोना बाधित रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या 26 ने अधिक. आज 231 रूग्ण बरे झाले. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्याही कालपेक्षा 38 ने कमी झाली. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 231 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 6736 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 3032 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 205 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 10249 झाली असून आतापर्यंत 481 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *