भडगावात फार्मसी कृती समितीतर्फे कोरोना योध्दांचा सन्मान!

Social कट्टा कट्टा भडगाव

भडगाव प्रतिनिधी ::> दि.25 सप्टेंबर, शुक्रवार रोजी भडगाव येथे जळगाव जिल्हा फार्मसी कृती समिती तर्फे कोविड योध्यांचा सन्मान करण्यात आला. भडगावातील कोरोना योद्धा हे रात्रंदिवस अवेळी नागरिकांच्या मदतीस तत्परतेने हजर होते म्हणून या कोरोना योद्धांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी खान्देश विभाग अध्यक्ष सौरभ माळी, कु.श्रद्धा मेथे, महाराष्ट्र युवतीप्रदेश कार्यअध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली कोविड योद्यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव जिल्हा युवती अध्यक्ष योगिता मुकुंदा महाजन, भडगाव तालुका अध्यक्ष मनीष जैन व चेतन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *