साकळीत केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

Politicalकट्टा कट्टा यावल साकळी

साकळी ता.यावल प्रतिनिधी ::> नुकताच केंद्र सरकारने शेतकरी कायद्या मंजूर केला. परंतु हा संपूर्ण कायद्या शेतकरी व कामगार विरोधी असून सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसान कारक आहे. म्हणून या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्याचा कार्यक्रम दि.२८ रोजी साकळी ता.यावल येथे आयोजित करण्यात आलेला होता.

सदर या कार्यक्रमप्रसंगी यावल तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, बाजार समितीचे माजी सभापती नितिन व्यंकट चौधरी, यावल पं.स.गटनेते शेखर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते सुभाष महाजन, माजी उपसरपंच किरण महाजन (साकळी), माजी उपसरपंच समाधान सोनवणे (थोरगव्हण),संदिप सोनवणे, गोविंद पाटील(मनवेल), गोकूल तायडे, गंगाराम तायडे, ग्रा.पं.सदस्य जगदिश मराठे, सचिन चौधरी, सै.अश्पाक सै.शौकत यांच्या सह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्याक्रमादरम्यान अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर यांनी निवेदनावर सहया केल्या. सदर निवेदन केंद्र सरकार कडे पाठविले जाणार आहे.