Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

Featured Jalgaon जळगाव रिड जळगाव टीम सिटी न्यूज

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे.

जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या लसींचा साठा हा ठाण्यात उपलब्ध होणार आहे. तेथून तो राज्यात वेगवेगळ्या माध्यमातून जिल्हास्तरावर पोहचवण्यात येणार आहे.

त्यासाठी विभागस्तरावर शितपेट्यायुक्त खास वाहन तयार करुन घेण्यात आली आहेत. नाशिक विभागासाठी तयार केलेले वाहन गेल्या आठवड्यातच तयार झाले असून लसींचा साठा आणण्यासाठी ही वाहने सज्ज झाली आहेत.

त्याचप्रमाणे विभागीय आरोग्यग्य संचालक कार्यालयाकडून प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात करावयाच्या लसीकरणाची यादी शुक्रवारी मागवण्यात आली आहे. त्यामुळे लस उपलब्ध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून आगामी २-३ आाठवड्यात जिल्ह्यात लस उपलब्ध होईल, असा अंदाज आरोग्य यंत्रणेतील वरीष्ठांनी व्यक्त केला आहे.