मुख्यमंत्री ठाकरे यांनी महिला अत्याचार-लव्ह जिहाद विरोधी महाराष्ट्रात कायदा लागू करावा!

Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केली मागणी

मुंबई >> हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे, जे लाजिरवाणे आहे. या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटलेला असताना ही आपणांकडून काही ठोस पाऊले उचलली जाऊ नये हे, दुर्दैवी आहे.

तसेच उद्धव साहेबांना माझी कळकळीची मागणी आहे कि आपण तत्काळ महिला अत्याचार आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा. आपली भूमिका जनतेसमोर मांडावी आणि आपल्या हिंदू माता-भगिनींवर येणारे धर्म संकटाचे सावट दूर करावे.