माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमान्तर्गत आरोग्य पथकातून अंगणवाडी कर्मचारी यांना वगळावे

चोपडा सिटी न्यूज

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मागणी

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> कोविड नियंत्रण व मृत्युदर कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबवित आहे.

स्थानिक पातळीवर आरोग्य पथके तयार करून रोज पन्नास घरांना भेटी देण्याचा कार्यक्रम करावयाचे ठरले आहे . सदर पथकात आरोग्य कर्मचारी आहेत पण माहिती पुस्तकात आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण विभागाची परवानगी घेऊन अंगणवाडी कार्यकर्ती घेण्याची सूचना आहे . स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी ,उपायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दबावाखाली प्रकल्प अधिकारी परस्पर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामाला जुम्पतात असा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेला आहे .सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे नियमित सर्व कामे त्यात आहार वाटप ,गृहभेटी ,पालक गटातून शिक्षण ,वजन मापे, पोषण आहाराची विविध कामे आणि लाभार्थी गटाचे सर्वेक्षण हे काम करावे लागत आहे आणि त्यात वरील आरोग्य पथकात त्यांच्या समावेश झाला तर बाकीची वरील नियमित कामे थांबून जातील जी यापेक्षा अधिक महत्वाची आहेत तरी वरिष्ठांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या व्यथा व कामांचा व्याप समजून घ्यावा व सदर कामातून मुक्तता द्यावी अशा आशयाचे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकारी चोपडा यांना देण्यात आले आहे .निवेदन देताना अमृत महाजन , लताताई प्रताप पाटील , सिंधुबाई सुभाष पाटील , वसला कैलास पाटील इत्यादी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *