चोपड्यातील उमर्टीत नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे आमदार सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन

Politicalकट्टा कट्टा चोपडा सिटी न्यूज

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> चोपडा तालुक्यातील उमर्टीत आदिवासी उपयोजनांतर्गत नविन पाणी पुरवठा योजनेच्या कामांचे भूमीपूजन नुकतेच आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांची ही उपस्थिती होती.

येथील गावातील लोकसंख्या वाढत असल्याने येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्याने ग्रामस्थांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांच्या नवीन योजनेच्या कामांची सुरूवात करण्याची मागणी केली. यासाठी आमदार सोनवणे यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी ३९ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आज या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.