चोपड्यात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : माजी आमदार कैलास पाटील यांची मागणी

आंदोलन चोपडा

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> आधीच कोरोनामुळे शेतीचे अर्थचक्र ठप्प झाले. त्यात आता वादळ व अतिपावसाने तालुक्यातील खरीप, बागायती पिके व फळबागांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार कैलास पाटील यांनी केले.

शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाकडून शुक्रवारी चोपडा तालुक्यातील शेतीविषयक विविध प्रश्नांवर तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन देण्यात आले. यानंतर पाटील यांनी नायब तहसीलदार राजेश पऊळ यांचेशी चर्चा केली. जिल्हा बँकेच्या माजी व्हाइस चेअरमन इंदिरा पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अमृतराज सचदेव, माजी तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, सुनील पाटील, भाईदास पाटील, मनोहर पाटील, सचिन धनगर, नंदकिशोर पाटील, नितीन पाटील, तुकाराम पाटील, संजय बोरसे, प्रदीप राजपूत, दत्ता नेवे, भोमा पाटील आदी उपस्थित होते.

तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन देण्यात आले. यानंतर पाटील यांनी नायब तहसीलदार राजेश पऊळ यांचेशी चर्चा केली. जिल्हा बँकेच्या माजी व्हाइस चेअरमन इंदिरा पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अमृतराज सचदेव, माजी तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, सुनील पाटील, भाईदास पाटील, मनोहर पाटील, सचिन धनगर, नंदकिशोर पाटील, नितीन पाटील, तुकाराम पाटील, संजय बोरसे, प्रदीप राजपूत, दत्ता नेवे, भोमा पाटील आदी उपस्थित होते.