चोपड्यात रोटरी क्लबतर्फे पोलिस चौकीस साहित्य भेट

Social कट्टा कट्टा चोपडा पाेलिस

रिड जळगाव न्यूज पोर्टलकडून चोपडा रोटरी क्लबला सलाम !

राजेंद्र पाटील चोपडा ::> छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौकीत फॅन व ट्यूब लाईट नसल्याचे रोटरी क्लबच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर लगेच ही सुविधा पुरवण्याचे ठरवण्यात आले.

चोपडा येथील शिवाजी महाराज चौकातील पोलिस चौकीसाठी चोपडा रोटरी क्लबतर्फे फॅन आणि ट्यूबलाइट भेट देण्यात आले. पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या उपस्थितीत पोलिस कर्मचाऱ्यांना रोटरीच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे साहित्य दिले.

या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रूपेश पाटील, पंकज बोरोले, अनिल अग्रवाल, विलास कोष्टी, चंद्रशेखर कोष्टी, प्रकाश पाटील, शिरीष पालीवाल, डॉ. अमोल पाटील, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील, निखिल सोनावणे, अर्पित अग्रवाल, चेतन टाटिया, गौरव महाले, पृथ्वीराज राजपूत, शशिकांत पाटील, धीरज अग्रवाल व मनोज पाटील, एम. डब्ल्यू. पाटील व सदस्य उपस्थित होते. प्रकाश पाटील यांचे सहकार्य लाभले.