कोरोना महामारी काळातील वीज बिल माफ करावे; चोपड्यात ‘आप’चे निवेदन

Politicalकट्टा कट्टा चोपडा

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> लॉकडाउनमुळे लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सामान्य जनतेला रोजच्या गरजा भागवणे ही अवघड होत आहे. त्यातच महावितरण कंपनीने विजेची दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. तर तत्काळ लॉकडाउन काळातले २०० युनिट वीज बिल माफ करुन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी चोपडा येथील आज आम आदमी पक्षातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चोपडा येथील आम आदमी पार्टीचे संयोजक रइस खान यांनी म्हटले आहे की, लॉकडाउन काळातील चार महिन्यांचे २०० युनिट वीज बिल माफ करावे, १ एप्रिलपासून केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी, जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिटपर्यंत ३० टक्के स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीज बिल मागे घेवून गत वर्षी याच कालावधीत जे वीज देयक आले त्याप्रमाणे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

आगामी १ तारखेपर्यंत ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज स्वस्त न केल्यास, आम आदमी पार्टीतर्फे जनतेला सोबत घेवून सर्व जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये फसवल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *