वर्डीत अनुदानित खासगी प्राथमिक शाळेची फी अव्वाच्या सव्वा…संस्था चालकांचा मनमानी कारभार : तक्रारदार

चोपडा


वर्डी ता. चोपडा प्रतिनिधी : > येथील100% अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीचा प्रवेशासाठी 3000रुपये इतकी रक्कम पालकांकडून घेतली जात होती. ही बाब बऱ्याच वर्षापासून सुरु आहे. प्रत्येक वर्षी पालक या बाबत विरोध करत होते. परंतु संस्था चालकांच्या दबावाखाली कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते. या वर्षी महेंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, चेतन साबे, अमोल पाटील, समाधान धनगर या लोकांनी आवाज उठवला असता या वर्षाची फी परत करण्यात आली आहे. तशी रीतसर तक्रार महेंद्र पाटील व टीमने तालुका शिक्षण अधिकारी यांच्या कडे तसेच जिल्हाशिक्षणाधिकारी यांच्या कडे लॉकडाऊन असल्याकारणाने व्हाट्सअप वर दिले आहेत. तरी त्याचा पाठपुरावा केला असता अधिकारी यांनी चौकशी केलीय असे असमाधानकारक उत्तर दिले आहे. तरी तक्रारदारचे RTE कायद्यांवये पहिली ते आठवी सरकारने मोफत व सक्तीचं शिक्षण केले. असता अशी फी वसुल करणे म्हणजे मोठा गुन्हा आहे, तरी यांची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये असा संतप्त सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे, नागरिकांचे असे म्हणणे आहे कि आजपर्यंत तुम्ही घेतलेली फी ही पालकांना परत करा अन्यथा तक्रार मागे घेतली जाणार नाही जर प्रशासनाने काही कार्यवही न केल्यास आम्ही उपोषणाचे हत्यार उपसू आम्ही एकटे नसून आमच्या सोबत अनेक पालक वर्ग व ग्रामस्थ आहेत असे तक्ररदारांचे म्हणणे आहे. तरी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *