आयशरच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू ; रावेरचे पती-पत्नी गंभीर जखमी

क्राईम चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील :>> अंकलेश्वर –ब-हाणपूर महामार्गावर शिरपूर कडून चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक चालकाने दुचाकीला ओहरटेक करतांना कट मारून समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हातेड बु! येथील दुचाकी स्वार जागीच मृत झाला तर ट्रकने कट मारल्याने दुचाकी वरील आटवाडे (ता. रावेर) येथील पती, पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अकुलखेडा जवळ घडली. तर गंभीर जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

अंकलेश्वर-ब-हाण पूर महामार्गावर शिरपूरकडून चोपडा शहराकडे भरधाव वेगाने येणारी आयशर ट्रक क्रमांक- एम एच १८ ए सी ७२४८ वरील चालकाने कडून चोपड्याकडे जाणारी दुचाकी क्रमांक-एम एच १८- १२४८ ला ओहरटेक करतांना कट मारून समोरून येणारी दुचाकी क्रमांक-एम एच १९ ए एल ३८८२ ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दयाराम शिवराम बाविस्कर (वय-५२) रा.हातेड बु! ( ता.चोपडा ) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

तर ट्रक चालकाने कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात आटवाडे (ता.रावेर) येथील ज्ञानेश्वर रमेश पाटील व सौ.विद्याबाई ज्ञानेश्वर पाटील हे पती,पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२० सप्टेंबर दुपारी चार वाजेच्या सुमारास अकुलखेडा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घटना घडली.

अपघातात जखमी पती,पत्नी यांचेवर जळगाव येथे उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. याबाबत ज्ञानेश्वर तुकाराम अहिरे रा. हातेड बु!(ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून गुरनं.१२७/२० भादवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८, ४२७मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४ (ब) प्रमाणेआयशर ट्रक चालक जगन्नाथ वना सपकाळे रा. फुकणी (ता. जळगाव) याचे विरुद्ध शहर पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यामार्गदर्शनाखाली पो. ना.प्रदीप राजपूत करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *