वर्डी तालुका चोपडा >> येथे शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिवप्रेमी यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात महाराजांचा मूर्तीचा अभिषेक करून करण्यात आली. गावातील माजी सरपंच नंदलाल निंबा पाटील, उपसरपंच उज्वल शिंदे यांनी अभिषेक केला व पूजन संदीप धनगर, दीपक सुलताने, दत्तात्रय पाटील, लहुष धनगर यांनी केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना गायन्यात आली व जयघोष करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले प्रास्ताविक भोला भाऊ जव्हागे, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल बाविस्कर, मनोज पाटील, समाधान धनगर, सुरज न्हायदे, राकेश पाटील, बाळा पाटील, मोहन करंदीकर, योगेश पाटील, चेतन साबे, महेश पाटील, राहुल पाटील तसेच सर्व शिवप्रेमी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले व समाज बांधवाना कोरोना आजरापासून आपला बचाव कसा करावा व सावधानता कशी बाळगावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.