रावेर हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा द्या ; आदिवासी कर्मचारी संघटनेची मागणी

आंदोलन चोपडा निषेध

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यालगत झालेल्या आदिवासी कुटुंबातील हत्याकांडाबाबत अनुदानित आदिवासी कर्मचारी संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना दिले. या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात चौकशी व्हावी, दोषींना लवकर फाशी द्यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात अाल्या अाहेत. या वेळी संघटनेचे जिल्हा सचिव मनोज ठाकरे, नीलेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख गजानन पाटील, ईश्वर पावरा, अविनाश कचरे, सुनील पाटील, भरत पाटील उपस्थित होते. निवेदनावर चंद्रकांत पाटील, नंदलाल पाटील, किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.