चोपडा तालुक्यात आज 23 कोरोना बाधित आढळले तर रुग्णसंख्या 312 पोहचलीय..!

चोपडा

चोपडा प्रतिनिधी >>चोपडा तालुका येथील आज प्राप्त 56 अहवालात 33 निगेटिव्ह 23 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे. त्यात चोपडा शहरातील 14 ग्रामीण भागातील 9 जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील पंचक 6, पूनगाव 1, अकुलखेडा 1, लासूर 1, चोपडा शहरातील पाटील गढी भागातील 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

चोपडा शहरातील वृंदावन धाम 6, बोरोले नगर क्र .3 मधे 3, प्रसाद नगर 1, गुजराथी गल्ली 1, भीम नगर 1, उर्वरित एका रुग्णाची माहिती उपलब्ध झालेली नाही.

चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 312, झाली आहे त्यापैकी 183 रुग्ण बरे झाले 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत काय म्हणतात ते ही पाहावे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *