चोपडा मनसेच्यावतीने सा.बां. विभागाला रेती-खळीचे प्रतिकात्मक ढंपर देऊन निवेदन !

Politicalकट्टा कट्टा चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते व आस्थापना विभाग जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या आदेशाने व मनसे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांच्या मार्गदशनाने व रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वाखाली, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना प्रतिकात्मक खळी व रेती चे ढंपर देऊन निवेदन देण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, चोपड्याकडून शिरपूरकडे व चोपडा-धरणगाव -अमळनेर कडे जाणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत व खड्यांमुळे अनेकांचे अपघात घडून लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे व वाहन चालवतांना तारेची कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावर प्रवास करणाऱ्या असंख्य व्यक्तींना हड्डीमध्ये व मणक्यामध्ये गॅप पडून सांधे दुःखी व पौंडेलीसिस सारखे आजार होत आहेत ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून आपल्यामार्फत त्याच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे, रस्त्याची दुरवस्था झाली आहे व हे रस्ते येत्या १५ -२० दिवसात खड्डे मुक्त करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश बारी, निखिल पाटील, अक्षय पाटील, सनी पाटील, विवेक मराठे, आकाश परदेशी, शुभम पाटील, विक्की सपकाळे, धीरज सोये, मनोज पाटील, तुषार मिस्तरी, पिंटु पाटील, किशोर पाटील उपस्थित होते.