आरोग्य सहाय्यीका आशा गजरे यांचे मिशन देवदूत अंतर्गत आभार

चोपडा सिटी न्यूज

लासुर ता. चोपडा (प्रतिनिधी-दिपेश पालीवाल) >> लासूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यीका श्रीमती आशा गजरे यांचे कोरोना युध्दात ते देत असलेल्या योगदानाबद्दल डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन संचलित मिशन देवदूत अंतर्गत पत्र पाठवून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच लॉकडाउन संपूर्ण परिस्थिती पूर्ववत झाल्यावर नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. कलाम कुटुंबीयांचा हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *