नैतिकता नुसती सांगायची नसते, तर ती आत्मसात करायची असते.

Social कट्टा कट्टा चोपडा

हभप विकास महाराज पाटील यांचे वक्तव्य

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> नैतिकता हि नुसती सांगायची नसते , तर ती प्रत्यक्ष आत्मसात करुन आचारणात आणायची असते असे सूचक वक्तव्य विकास महाराज पाटील यांनी तावसे बु ता चोपडा येथे सुरु असलेल्या पुण्यतिथि कीर्तन महोत्सव प्रसंगी केले . नैतिकता आणि मानुसकी त्यानुसार जीवनाची वाटचाल करावी लागते. जीवनामध्ये पैसा सर्वस्व नाही. पैसा आवश्यकच आहे, परंतु नितीने मिळवलेल्या पैशात बरकत असते.

अशा माणसाच जीवन सुखी होत असते.
तावसे बु येथे सुरु असलेल्या पुण्यतिथी कीर्तन महोत्सवातून ह.भ.प. विकास महाराज पाटिल यांनी मनुष्य कुठ्ल्याही क्षेत्रात असो, राजकिय क्षेत्रांत, धार्मिक क्षेत्रात, शेतकी क्षेत्रात किंवा नोकरी क्षेत्रात असो, नैतिकतेची नितांत आवश्यकता आहे. नैतिकता ही संस्काराच्या माध्यमातून संपन्न होत असते आणि संस्काराचे बाळकडू आईवडीलांकडून प्राप्त केले पाहिजे.
तावसे बुद्रुक येथे वैकुंठवासी मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या पुण्यस्मरणानिमीत्त चालू असलेल्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प. विकास महाराज पाटिल यांनी “आपुलिया हिता जो असे जागता” या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण करताना मातापितांना धन्यता देताना जो आपल्या नैतिकतापूर्वक हिताला जागृत असतो त्याचच जीवन सार्थकी लागते.त्यांनी विविध उदाहरण व दाखले देऊन नैतिकता जीवनात कशी व किती महत्वपूर्ण आहे हे पटवून दिले.

कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनाची पार्श्वभूमी पाहता श्रोते विना तीन दिवशीय कीर्तन महोत्सव सुरु आहे . मंदोदरी अमृत चौधरी यांच्या पुण्यतिथि निमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आलंदी वारकरी सम्प्रदायचे सचिव श्री नरहर महाराज चौधरी , अशोक अमृत चौधरी व धनराज अमृत चौधरी यांनी आपल्या मातोश्रीच्या पुण्यतिथि प्रीत्यर्थ किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

आई वडिलांच्या स्मरणार्थ तावसे बु॥ येथे तीन दिवसीय श्रोते विना कीर्तन महोत्सवाचे आयोजन

भारतीय संस्कृतीत मातृपितृदेवोभव:, आचार्य देवोभव:,अतिथीदेवोभव: या त्री सुत्रीस अनन्य साधारण महत्व आहे.माणसाच्या जन्मानंतर आईच्या कुशीत दूध पितांना संस्कारांचे शिक्षण मिळते म्हणून आईवडील हे पहिले विद्यापीठ आहे आणि ही संस्कारांची शिदोरी माणसाच्या आयुष्यभर उपयोगी पडते. प्रत्येक मुलावर माता पित्यांचे थोर उपकार असतात. म्हणून आई,वडीलच खरे गुरू आहेत. ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले त्या माता पित्यांची आयुष्यभर सेवा करणारी काही मुले आज देखील या भौतिक जगात बघायला मिळतात.

आजच्या बदलत्या काळात परंपरागत एकत्र कुटुंबाची व्यवस्था मोडकळीस आली असून,हम दो हमारे दो ह्या पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार झाल्याने आई वडीलांपासून मुले दूर गेली आहेत.त्यामुळे आई,वडिलांवर एकटे राहण्याची वेळ आली आहे.हे जरी खरे असले तरी आज आई – वडिलांना देवासमान मानणारी मुले,मुली व सुना बघायला मिळत आहेत.परंतू समाजात याचे प्रमाण खूपच नगण्य आहे.

आज ही ग्रामीण भागात बहुतांश कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धत असून,आई,वडीलांचा मानसन्मान व आदर केला जात आहे.त्या तुलनेत शहराच्या संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्था नेस्तनाबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.माणसाच्या जीवनात पैसा व संपत्तीने सुख व समाधान मिळत नाही तर आई – वडीलांच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध होत असते.आई, वडीलांच्या प्रति कृतघ्न असणाऱ्या मुलांचे कधी भले झालेले दिसत नाही.परंतु ज्या मुलांनी माय, बापांना दैवत मानून त्यांची सेवा केली त्या मुलांचा उद्धार झाला आहे व होतच असतो. याचे आदर्श उदाहरण तावसे बु॥ (ता.चोपडा) येथील रहिवासी श्री.अशोक अमृत चौधरी, श्री.धनराज अमृत चौधरी, सौ.आशाबाई रतिलाल पाटिल व आळंदी स्थित असलेले,वारकरी संप्रदायाचे सचिव ह.भ.प. श्री.नरहरी अमृत चौधरी या चार भावंडांनी यांचे आईवडील मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय श्रोतेविना कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून आई- वडीलांचे प्रति कृतज्ञ राहुन प्रतिवर्षाप्रमाणे सेवा करत आहेत. समाजात अशी मुले जन्माला आली तर वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही आणि आईवडीलांचे महत्व या खालील वाक्याने कळेल.कवी यशवंत देव यांनी म्हटले आहे “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” !