कोरोनाची चाचणी करायची सांगितल्याचा राग आल्याने डॉक्टरांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी!

क्राईम चोपडा

प्रतिनिधी चोपडा >> शहरातील पाटील गढीतील तपस्वी मारोती मंदिराजवळ डॉ. प्रशांत मुरलीधर पाटील याना एकाने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

शहरातील रंगराव आबा नगरमधील रहिवासी असलेले संजय पंढरीनाथ महाजन यांच्या पत्नीला डॉ. प्रशांत पाटील यांनी २४ रोजी सकाळी ११ वाजता कोरोना चाचणी करावी लागेल, असे सांगितले. याचा राग आल्याने संजय महाजन यांनी डॉ. प्रशांत पाटील यांना त्यांच्या रुग्णालयात शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डॉ. प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून संजय महाजन यांच्याविरुद्ध कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.